नागपंचमी
नागपंचमीचा सण
किती उत्साहा उधाण
करू नागाचे पूजन
अन् वारुळा रक्षण
नको नांगर खनन
नको चिरणे भाजणे
होता नागाचे जतन
मित्र सख्याला जाणणे
पद्मनाभ शंखपाल
धृतराष्ट्र तक्षक कालिया
अनंत वासुकी कंबल
अष्ट नागांना पुजूया
लावू हाताला गं मेंदी
भाऊ नेईल माहेरी
झोके बांधू गं फांदीला
करू पंचमी साजरी
मुर्ती नागास रांगोळी
फुल तृणांची गं काढू
गोड दूध अन् लाह्या
नैवेद्य नागाला दावू
गाऊ नागाची गं गाणी
नमू नाग देवतेला
नको अनिष्ट त्या रुढी
जपू खऱ्या निसर्गाला
स्वाती लेले,
नवीन पनवेल






Be First to Comment