Press "Enter" to skip to content

भाव विश्व

“भाव विश्व”

आजकाल मी विचार करायचे सोडून दिले आहे
असणारा प्रत्येक क्षण माझ्याबरोबर जगतो आहे

कालपर्यंत मी तुझ्या पासून दूर होतो
आज माझ्या प्रत्येक क्षणाचा तू साक्षीदार आहे

असलेल्या नसलेल्या आठवणीं हृदयायात आहे
श्वासागणिक तुझ्या असण्याचा आनंद मनात आहे

आज मला तू नव्याने गवसला आहे
भूत-भविष्याची चिंता कायमची मिटली आहे

नाम तुझे माझ्या मुखात,अंतरंगात,शब्दब्रह्मात
चिपळ्यांच्या नादात,टाळ, मृदुंगाच्या गजरात
श्रीहरी,विठ्ठला, पांडुरंगा!

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.