दत्तक
वांझोटी नसते कधीच कुठलीच माती
खडकावर ही अंकुरतात गवताची पाती
प्रेमासाठी आसवलेला देवकीचा कान्हा
त्याच ममतेने यशोदेलाही फुटतो पान्हा
पूर्वजन्मीचे असतात काही ऋणानुबंध
त्यापोटीच जुळत जातात अनुबंध
कावळीच्या घरट्यात वाढतो कोकिळ
जगच बदलते चिमण-जीवांची किलबिल
अनाथांना मिळते घर, माऊलीला तान्हा
दत्तक विधानाकडे कधी असेही पाहा
पौर्णिमा दिक्षित, नवीन पनवेल







Be First to Comment