नातीगोती
देती जगण्या जीवनरस
नातीगोती रंगत-संगत
प्रेम माया जिव्हाळ्याची
जमते कधी सुरेल पंगत
सगे- सोयरे घरचे दूरचे
मनभावना गुंतती सारे
मुखवटे चेहरे कधी कुणाचे
अनवट भावतरंग न्यारे
नाती रेशमी हिरवा श्रावण
वैशाख वणवा केला पार
हिरवा गोफ गुलकंदी स्वाद
हृदसुगंधा नाही पारावार
पापण्यात रितेपण भरून येता
दरवळे तो मैत्री सुवास
नात्या पल्याड अनोखी मैत्री
आनंद रसाचा पुरवठा खास
नाती अल्लड फुलपानांशी
मातीच्या लडिवाळ बाळांशी
गच्ची गॅलरीत हिरवी झाडे
उमलत्या निसर्ग चैतन्याशी
अशी नाती किती विलक्षण
जीवन प्रवासी श्रीमंती
आयुष्याच्या पानगळीत
आनंदाच्या सरी बरसती
सुजाता खरे







Be First to Comment