चांदणे
दरवळणा-या मातीसंगे
शुभ्र चांदणे बरसुन यावे ।
बहरुन यावी किती कोंदणे
अन धारांनी ऊन भिजावे ॥
ठसे रुतावे पापणीतही
पाऊल ते ही भिजून जावे ।
सांजवेळच्या इंद्रधनुने
निशिगंधाला सजवुन जावे ॥
म्रुगशीर्षाच्या धारांसंगे
कातरवेळी भरुन यावे ।
डोळ्यामधल्या पागोळीने
ओंजळीतही बहरुन यावे ॥
केदार जोशी, पनवेल







Be First to Comment