रेशीमनाती
ही नाजूक रेशीमनाती
जीवना आधार देती
स्वप्नांची बाग फुलविती
मोगऱ्यासम दरवळती
ही नाजूक रेशीमनाती
कर्तव्यात तत्पर असती
विश्वासाच्या बांधून भिंती
पंखांना बळ ही देती
ही नाजूक रेशीमनाती
त्यागातच बहरून येती
प्रेमाच्या ओलाव्याने
एकमेका जपतच रहाती
ही नाजूक रेशीमनाती
आठवांचा गोफ विणती
तरल भावना जपुनी
बकुळ फुलासम दरवळती.
सौ.संध्या करंदीकर, नवीन पनवेल







Be First to Comment