सर पावसाची
उतरले मेघ खाली
वाट वेल्हाळ ही झाली
दरवळला मृदगंध
मन झाले बेधुंद
प्रफुल्लित चराचर
थेंब थेंब पानांवर
तृषार्त धरणीवर
ओल्या मायेची पाखर
चिंब भिजले डोंगर
फुटे मायेचा पाझर
कपारीच्या कुशीतून
जन्म घेतात निर्झर
सौ जयश्री ताम्हनकर, नवीन पनवेल

सर पावसाची
उतरले मेघ खाली
वाट वेल्हाळ ही झाली
दरवळला मृदगंध
मन झाले बेधुंद
प्रफुल्लित चराचर
थेंब थेंब पानांवर
तृषार्त धरणीवर
ओल्या मायेची पाखर
चिंब भिजले डोंगर
फुटे मायेचा पाझर
कपारीच्या कुशीतून
जन्म घेतात निर्झर
सौ जयश्री ताम्हनकर, नवीन पनवेल
Be First to Comment