Press "Enter" to skip to content

मेळ

मेळ

आता असे करू
संगतीने चालू
ठेऊ भरवसा
मेळ या हो घालू…

आता असे करू
कर्मवाट धरू
मानव्याच्या तिरी
मांगल्य पसरू…

आता असे करू
सोडू सारे द्वेष
प्रेमानेच धरू
सौजन्याचा वेष …

आता असे करू
बोलू या सर्वांशी
ओळख या धरू
व्यक्तीच्या मनाशी…

सौ..अदिती गोखले, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.