नात्याची सायकल
नातं म्हणजे जणू सायकल
समतोल राखणं हेच त्याचं बल…
नातं असेना का दिसायला
सायकल सारखं विचित्र…
दोन चाकं आणि प्रेमाची साखळी
असावीत मात्र एकत्र….
जेव्हा नवीन असतं नातं
तेव्हा लागतो आधार…
प्रत्येकाला शिकावचं लागत
कशी घ्यावी माघार…
चालून, धावून जेव्हा
चिडेल कंटाळेल एक चाक…
तेव्हा समतोल राखून दुसर्याने
मारावी एक प्रेमळ हाक…
जेव्हा हवा निघून जाईल
आणि चाक होईल पंक्चर….
असते प्रेमाची साखळी
हक्काने विसावं दुसऱ्यावर…
प्रेमाची साखळी
ठेवता कोरडी कशाला ?
रुसवे फुगवे मजा मस्करीचा
लागतो तिला मसाला…
रस्त्यात येतील अडथळे
सायकल थोडी मंदावेल….
दोन्ही पायडलच्या सपोर्टने
बघा कशी सुपरफास्ट धावेल…
नातं म्हणजे जणू सायकल
समतोल राखणं हेच त्याचं बल…
- शार्दूल दामले, नवीन पनवेल







Be First to Comment