रिमझिम पाऊस
रिमझिम रिमझिम पाऊसाची धार
वाहतो चहुकडे…
चहुबाजूने भरुन गेला…
पाऊसाच्या निर्मळ पाण्यात न्हाऊन
तरु-तृण तृप्त झाले…
अंगावर लागलेली धुळ, माती
पाऊसाच्या पाण्याने धुवून नेले.
रिमझिम रिमझिम पडे पाऊस
झाडं, फुलं सजीव झाले…
पाण्याचा स्पर्श लागून..
कोवळे फुल देखिल फुलून गेले..
फुलांचे स्मित हास्य चहुकडे.
आनंदाचे दिसू लागले.
बहरलेल्या फुल बागेत….
तुझ्या हातात हात घालून..
पाऊसाच्या पाण्यात चिंब भिजून..
तुझा डोळ्यात डोळे घालून…
मी बघत असते तुझ्या कडे…
रिमझिम रिमझिम पाऊसाची धार वाहते चहुकडे.
सौ. अपराजिता माधव घांगुर्डे
खांदा काॅलनी.







Be First to Comment