विहग सानुला…
अंगणातल्या झुडुपामधुनी
विहग सानुला रोजची येतो
ओटीवरती करुनी किलबिल
गुज मनीचे सांगू लागतो..
नजर ठेवूनी दारावरती
कुणा कुणा ते पाहत बसतो
सोयरीक जणू गतजन्माची
पुन्हा नव्याने शोधत असतो..
बालसुलभ ते खेळ रचूनी
मुक्तपणे तो विहरत जातो
सोडून अपुले सखेसोबती
शीळ नव्याने घालीत बसतो..
कातरवेळी दिवे लागता
पुन्हा अचानक निघून जातो
रोज प्रभाती येऊन सत्वर
जणू मायेचे विणही रचतो…
©समीर खरे, पनवेल
8879737388







Be First to Comment