Press "Enter" to skip to content

तडजोड

तडजोड

काय चुकले अचानक आठवताना सारे काही
विसरून गेलो आहे का विचारले प्रश्न काही

आवडनिवड जपताना होते तुझ्या आधीन सर्वकाही
कुठे दडले कसे रुसले आपल्यातले ते प्रेम काही

मी आयुष्याच्या वळणावर गवसलेले ते सर्वस्व पाही
कुठे अचानक विरून गेली आपल्यातली तडजोड काही

हासताना रुसणारेही मी वदनावरचे भाव पाही
रडतानाही अश्रुंमधले ते पाणी आता दिसत नाही

कसे बदलले असे अचानक आयुष्याच्या वाटेत काही
दुरावले हे श्वास माझे माझ्याकडेही हासून पाही

बोलावताना तुला जवळ शब्दही आता फुटत नाही
कसे व्हायचे भविष्य अपुले उत्तर मला मिळत नाही

  • स्वानंद नंदकुमार मराठे, पुणे

2 Comments

  1. Chandan Sawant Chandan Sawant June 30, 2021

    Chan

  2. Chandan Sawant Chandan Sawant June 30, 2021

    Khup chan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.