पडद्यामागचा बाप
बाप दोन अक्षरी शब्द
परी ताकद तयात महान
कुटूंबाचे कल्याणार्थ
रातदिस तुडवितो रान ……..१
बाप पडद्यामागचा हिरो
कुणा कधी का कळतो ?
येता संकट घरादारावर
संकटमोचन खरा ठरतो ……..२
झिजवितो आपुली काया
मेहनत करुनी अपार
त्याच्या कामाची बरोबरी
कशाशी नाही होणार ………३
कष्ट हेची खरे धन
अविरत धंदा चाले तोची
जगा मिळाया भाकरी
पर्वा नसे घामाच्या धाराची ……४ *श्री.नंदकुमार विठोबा मरवडे,* *श्री. क्षेत्र तळवली,ता.रोहा,जी.रायगड.*







Be First to Comment