हिरवा साज
ओढा फेसाळ, नदी दुधाळ
झाडे झाली हिरवीगार
श्रावण सरसर आली झरझर
माती झाली ओलीशार
हळूच दडले ऊन कोवळे
लपंडाव हा सुरू जाहला
मोरपिसारा फुलवित जणू
हिरवा श्रावण खुशीत आला
दिडदा दिडदा त्याचे स्वर
आळवितो केदार कधी तर
गुच्छ फुलांचे रान तु-यांचे
प्राजक्ताचे सडे अपार
ध्यानस्थ डोंगर जागे झाले
हिरवी सृष्टी पाहून रंगले
अवखळ निर्झर मुक्त सोडले
मधुमासाचे स्वागत सजले
सुजाता खरे:(नवीन पनवेल)






Be First to Comment