भरारी
तूच तुला ग सावरणारी
तूच तुला ग आवरणारी
पाश सारे सोडून मागे
घे आता तू उंच भरारी
नवेच आता प्रश्न समोरी
शोध तुझी तू अशी उत्तरे
नको कुणाची संगत आता
घे आता तू उंच भरारी
नको धरू तू हात कुणाचा
फक्त हवा तो विश्वासाचा
शील स्वतःचे तुझ्याचहाती
घे आता तू उंच भरारी
सापडला तो मार्ग नवा जरी
विचार करूनी पुढे चाल तू
आठव आई बाबा सारे
घे आता तू उंच भरारी
सई मराठे, पनवेल







Be First to Comment