ती
ती आली——
पावसाच्या सरीने ओलीचिंब होऊन आली
त्याच्या भेटीसाठी खूप आतुर झाली
वार्याची गार झुळूक तिला शहारून गेली
गुलाबी गालावर गोड खळी खुलली
ती आली——-
त्याच्या भेटीसाठी झाडाखाली थांबली
त्याला पाहताच लाजरी बुजरी झाली
पावसात ही जगाचे भान विसरली
त्याच्या ओढीने गालावर लाली उमटली
ती आली——
त्याला भेटताच मनी आनंद लोटला
परस्परांच्या भावनांचा पूर वाहू लागला
शब्दावीण मनाच्या तारा जुळल्या
अन् मनातील भावना आपसुक ओठावर आल्या
ती आली——
मग दोघांचे भावविश्व खुलले
एकमेकांच्या साथीत बेधुंद होउनी गेले
विसरले भान जगाचे, कोणी पाहिल याचे
आपल्याच विश्वात दोघे रंगून गेले
ती आली——
पावसात चिंब भिजूनी आली
गुलाबी गालावर गोड खळी खुलली.
नयना पेंढारकर, नवीन पनवेल







Be First to Comment