Press "Enter" to skip to content

आनंदाचे क्षण..

आनंदाचे क्षण..

क्षण क्षण आनंदाचे वेचित आले इथवर ,
कृतज्ञतेचे अश्रू नकळत ओघळले गालावर……..
माहेराची सुखद आठवण मंद झुळुकेपरी ,
प्राजक्ताचा सुगंध घेऊन दाटून राहे उरी……
सदैव तेवे देवघरातील समईच्या ज्योती ,
तृप्तीने घट तुडुंब भरले समाधान चित्ती……
सुख समृद्धी अविरत नांदे , भरले गोकुळ सारे ,
सुरकुतलेला हस्त शिरावर ,नातवंडाच्या फिरे………
किती दिले देवाने , वाहे भरूनी माझी झोळी ,
वाटीत आले प्रेम जिव्हाळा,
झोळी सदा भरलेली…
मन हे रमते प्रभुच्या चरणी , नाम सदा ओठी ,
भक्ती करण्या शक्ती मिळो , हो जीवा शिवाची भेटी….

विजया करंडे प्रिन्सटन , यू.एस.ए.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.