पाऊस
आषाढघन मेघाने
सारे झाकोळले नभ
संततधार वरूणाने
धरित्री झाली तृप्त
डोंगर माथ्यावरून
ओघळती शुभ्र धारा
विलोभनीय भासतो हा
सृष्टीचा अनुपम नजराणा
खिडकीपाशी उभी
पाऊस पाहण्या दंग
मौज वाटे मज पाहूनी
थेंबाथेंबांची सुंदर रांग
सुखवले या सरींनी
तापलेल्या धरेला
आणिक सुखावले
तगमगलेल्या जीवाला..|
वर्षा मेहेंदर्गे.., नवीन पनवेल







Be First to Comment