गर्वहरण
झाला फुकाचा अभिमान
गूढ हासे विश्वम्भर
वाटे पेलतो जगाची कमान
गर्व क्षणात पसार
होई मानव गर्भगळीत
फुका केला गर्व कारे
पाहुनिया तांडवफलीत
वाटे निरर्थक सारे
जाई निसर्गाला शरण
जीवन करीतसे नेमस्त
धरी देवाचे चरण
कडीकुलुपात बंदीस्त
करी देवाचा हो धावा
टळो हे कोरोना अरिष्ट
गिरीधरा वाजव तुझा पावा
मानवतेचे दाखवू धारिष्ट्य
दिपाली जोशी, नवीन पनवेल







Be First to Comment