कोरोना
कोरोना च्या नावातच आहे रडणे
काही लोकांना झाले कायम मुकणे
कोणी झाले दफन तर कोणी झाले दहन
विनाशा च्या या खेळाला कसे करावे सहन
किती आहे हा क्रूर
माणसा ला माणसा हून केले दूर
ना सहभाग दुःखात, ना सहभाग सुखात
ना अभ्यास ना खेळ आहे या काळात
जर ठेवले उघडे तोंड आणि नाक
तर करोना होईल खतरनाक
कोरोना ला दूर ठेवून पुन्हा घेऊ जीवनाचे सुर
नियमांचे पालन करून ठेवू याला दूर
काही दिवस राहू गर्दी आणि जमावा पासून दूर
संयम आणि नियमांचे पालन हाच आहे मोठा गुर
नकारू नका देऊन कुठलेच कारण
आता करून घेऊ लसीकरण
स्वस्थ राहण्याचे आहे हे समीकरण
ठेवू आम्ही सुरक्षित वातावरण
प्रशांत सहस्रबुद्धे, नवीन पनवेल







Khup chaan Prashant dada. Keep it up 👍