Press "Enter" to skip to content

रिऍलिटी-शोव ज ची मांदियाळी

रिऍलिटी-शोव ज ची मांदियाळी

रिऍलिटी-शोव ज ची मांदियाळी,
किती खरी, किती उतरवी गळी !!

छोटी छोटी पिल्ले,
करती कमाल करामती,
त्यांच्या ध्येयासाठी,
पालक ‘उरस्फोड’ करती .

पिल्लू जाते जेव्हा,
त्यात फायनल राऊंडला,
उलगडले जाते मग,
त्याच्या पालकांच्या-मेहनती ला.

‘ग्लिसरीन’ वाल्या परीक्षकांचे,
मग डोळे भरून येतात,
पालकांच्या खऱ्या-खुऱ्या आसवांना,
मुद्दामच वाहू देतात.

TRP जातो उंच,
कार्यक्रम सक्सेसफुल ,
पिल्लावर पांघरली जाते, यशस्वी-पणाची-झूल .

झोपडीतल्या पालकाची नजर,
जज-शिल्पा वर,
क्षणभर ठेवू पाहतात,
स्वतःला त्या जागेवर.

पण जज-शिल्पा ची म्हणे, स्वतःची खास गाय
त्या खास-दुधाची-ताजगी, ‘पिशवी’ ला येणार काय?

गाय देखील तिची म्हणे,
AC-मध्ये चरते
झोपडीतली माऊली बिचारी, चुलीसमोर राबते.

पण मिळतात त्या माउलीलाही,
निदान काही-सुंदर-क्षण,
पार करण्या आयुष्यातले,
पुढचे ‘वाळवंटी-रण’ !

मानसी कुलकर्णी,
नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.