मल्हार
मल्हार नांदतो इथे
मल्हार गर्जतो इथे ।
नाद हा विजांसवे
मल्हार सांगतो इथे ॥
कड्यातुनी खळाळतो
सरीतुनीही नाचतो ।
दरी दरीत हा पहा
मल्हार गुंजतो इथे ॥ ॥
सळसळे वनात हा
दरवळे मनात हा ।
श्वास श्वास वेचुनी
मल्हार गंधतो इथे ॥ ॥
असाच मैफिलीत हा
सुरातुनी ही स्पर्शतो ।
बंदीशीतुनी पुन्हा
मल्हार रंगतो इथे ॥ ॥ -© केदार जोशी, पनवेल







Be First to Comment