थोडं मनातलं…
असतं एखादं गोड गुपित
मनामध्ये दडलेलं
आठवांच्या आवर्तनातून
आत्म्याठायी भिनलेलं…
हळुवार एका फुलावाणी
मनी अलगद जपलेलं
मायेच्या त्या ओलाव्याने
अंतरी खोल रुजलेलं…
सागराच्या खोलीमध्ये
गूढ गर्भात लपलेलं
आभाळासम पसरून सारे
क्षितिजापाशी उरलेलं…
अत्तराच्या कुपीमधल्या
सुगंधासम असलेलं
ताटव्यात त्या पहुडलेल्या
कळ्यांमध्ये मिटलेलं…
चंद्रासम त्या मुखावरती
खळीमधुनी खुललेलं
या हृदयीचे ते हृदयी
घट्ट बांधून ठेवलेलं…
©समीर खरे, पनवेल
8879737388







Be First to Comment