“सोहळे..-.. मी”पणाचे
फार लांबीयले
कौतुक सोहळे
प्रसन्न ची जाहले
मठाधिपती
कणाहीन सगळे
जमविले खासे
कोणी गायले पोवाडे
कोणी लिहिली बखर
जग जणु सगळे
घेतले मुठीत
आभास ची सगळे
आभासी सोहळे
मी पणात सारे
येथे ते गुंतले..
आम्हावीण तो नसे
दुजा कोणी..
विसरून ते गेले
शाश्वत सत्य
कोणा वीण येथे
अडे चिना..
चंद्र सूर्य तारे
येऊनिया जाती
उजाडायचे ते रोज
थांबे चिना..
करोनि जो कर्म
म्हणे ईदम न मम
तोचि गाठत असे
आयुष्याची सम
मिलिन्द गांगल, पनवेल







Be First to Comment