सावळा राधेश्याम
ललत गाता मधुर गायने
कुहूकुहू साद आम्रतरुवर
गंधित वारा वाहे परिमळ
नीळनिळाई तून श्यामसुंदर
भूपाळी स्वर मंजुळ छेडीत
जाग जागली पूर्वा हर्षित
भैरव जागवी नंदकिशोरा
उषा हासली नव उन्मेषित
राधा ठुमकत सवे गोपिका
पैंजण छुमछुम गुंजत मधुर
खिल्लारांच्या घांगरमाळा
छैलछबिला मोहवी क्षणभर
सजल घागरी सलज्ज राधा
मोरपीस करी बावरी राधा
जललहरीतून सावळ बाधा
हसला माधव हसली राधा
सुजाता खरे, नवीन पनवेल







Be First to Comment