प्राजक्त
मला ठावूक आहे हे ,तुझ्या स्वप्नात येते मी।
तुझे ते आरसे खोटे तरी सत्यात येते मी।।
जरा जाणून घे रुक्मा,कुणी प्राजक्त वाढवला।
सडा दारात पडताना ,तुझ्या मनात येते मी।।
तिच्या गरिबीत ही तेव्हा दिवाळी होत होती ना।
अता पैश्यात रमताना तिच्या डोळ्यात येते मी।।
मिठीमध्ये चमेलीच्या जसा भ्रमर गवसलेला।
तशी दिसते तशी फसते जणू रंगात येते मी।।
घरी माहेर ची वस्ती, मनी माहेरचा गंडा।
कशी प्रेमात येवू रे,म्हणे अंगात येते मी.
स्मिता गांधी, पनवेल







Be First to Comment