पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांचा वाढदिवस वृक्ष रोपण करून साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरणाचे दिवशी सईद मुल्ला यांचा जन्मदिवस येत असल्याकारणाने वृक्षरोपण करून तो साजरा करण्यात आला.लावलेले वृक्ष जतन करण्याचा संकल्प या वेळी सगळ्यांच्या वतीने करण्यात आला. सईद मुल्ला यांना ७७व्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुड मॉर्निंग ग्रुप चे सदस्य उपस्थित होते. तालुका क्रिडा केंद्राच्या मैदानावर हा सोहळा पार पडला.यावेळी ऍड चंद्रशेखर वाडकर,संजय पाटकर,राजेश शेट्टीया, सुभाष पाटील, प्रफुल्ल पेडसे, डॉ संतोष जाधव, डॉ ययाती गांधी,डॉ आशिष गांधी, डॉ मिलिंद जोशी,सागर आटवणे,विजय पाटील, अप्पू कुंभार,सचिन ङागरे ,कुणाल सावंत,नितीन पाटील ,प्रदिप पाटील,रवि घाङगे,केदार माने ,अभिजीत पाटील ,यशंवत पाटेकर ,युसूफ पटेल.त्रिशुल म्हात्रे ,प्रमोद पाटील,संदीप पाटील आदी उपस्थित होते.








Be First to Comment