मृत्यू दिनांक–24/7/2019
प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दि.२४ जुलै २०२०
🙏🏻 आपल्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
सार्थंक तुझ्या आठवणीत सरले वर्ष
तेवत ठेवूनी नेत्रात सतत तुझी मुर्तीं,
किती वर्णांवी तुझ्या मायेची महती,
तुझ्या जाण्याने ओस पडली आकाश आणि धरती,
बेटा,तुझ्याच आठवणीत दिवसरात्र सरती!
तुझ्या आठवणी आमच्या स्मरणात सदैव तेवत राहोत,
तुझ्याविना दिवसरात्र आम्ही मम्मी पप्पा जगत आहोत,
पावलोपावली येतो- तुझ्या आठवणींना उजाळा,
कुठे आहेस तू ? ये लवकर ,वाट पाहत आहे माझ्या सार्थंक बाळा !!
वियोगाचा वणवा उरी पेटवून गेला स्मृती,
इंद्रधनुचे सारे रंग दाखवून गेला स्मृती,
मोठे होवुन तुला बनायचे होते पोलिस अधिकारी,
इच्छा पुर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घे मम्मीच्या पदरी !!!
तुझ्यासारख्या साध्या ,भोळ्या, हुशार,मायाळूची आम्हा गरज,
तुझ्याविना एकही दिवस नाही सरत,
बाळा,मी आयुष्यात नाही कधी कोणाचे केले वाईट,
पण, तुला अचानक देवाने का केले साईंट!!!!
तुझ्या आठवणी सदैव आहेत स्मरणात,
तुझ्या आठवणी वेळोवेळी येतात क्षणात,
वाट पाहत आहे,तुझी आम्ही आतुरतेने,
जन्म घे पुन्हा पदरी हिच विनवणी
ईंश्वरचरणी 🙏🏻🙏🏻 तुझ्यासाठी व्याकुळ मम्मी ,पप्पा,आजी ,आजोबा,दिदी,मामा,मामी,ताईं, मावशी,काका






Be First to Comment