प्रवास
वाट तुझिया घराची
नागमोडी सोनसळी
मऊसूत बहाव्याची
पायवाट मखमली
तीव्र ग्रीष्माचा उन्हाळा
प्राण कंठाशीच दाटे
लिंपी बहावा जिव्हाळा
सांगे चांदण्याशी नाते
लालबुंद पळसाला
किती ज्वाळा लपेटल्या
तप्त सुर्व्याचा तो दाह
अंगोअंगी मोहरला
वाट विरळ चालली
तिच्या सोबत कारंज
बकुळीच्या सुवासात
गोड सयींचा तरंग
हर मातीच्या कणात
दडे अंकुराची रास
मुग्ध प्रेमक्षणांना रे
नवजीवनाची आस
खरी प्रीत तुझी माझी
लावू शिसवाची तीट
ताज्या सोनेरी क्षणांना
पांगारा हवा समीप
रानोमाळी भटकंती
संगे चंद्राचा प्रकाश
काजवेही साथ देती
निसर्गाचा सहवास
तुझ्या सवे हा प्रवास
चालो अनंतची असा
नको घराची चौकट
वनश्रीचा भरवसा
स्वाती लेले, नवीन पनवेल







Be First to Comment