महेश्वरीची महाश्वेता
उदार तू राज्यकर्ती ,
पुण्यतेजाने तळपली दीप्ती सात्विक, सत्य कर्मयोगिनी,
लोककल्याणकारी तेजस्विनी, झुंजार कर्तुत्वशालीनी,
शूर लढवय्या रणरागिनी,
प्रजा वत्सल महाराणी,
होती आदर्श महिला ती सद्गुणी, उदात्त मुस्तदी सेवाव्रत धारिणी समर्पित कणखर मर्दानी,
धैर्य शौर्य औदार्य जननी,
जीवनचरित्र निर्मळ देवता,
ज्ञान श्रद्धा भक्ती पतिव्रता,
देवी सुसंस्कृत राजमाता लोकप्रिय लौकीकाची कर्तव्यगाथा,
शक्तीचे रूप शालीनता
व्यापी दातृत्वाचे विशालता उभारुनी अन्नछत्र धर्मशाळा मंदिरे घाटमाथा
भारतभूची महेश्वरीची ही महाश्वेता,
अजिंक्य स्थितप्रज्ञ विरांगणा, कर्तृत्ववान दिपस्तंभ मानवंदना, सुवर्णाक्षरांनी कोरला इतिहास पानोपानी , पराक्रमी सात्विक सार्थक केले जीवनी ,अशी लाभली धैर्य शौर्य औदार्याची जननी!
पूर्णिमा शिंदे, मुंबई







Be First to Comment