Press "Enter" to skip to content

सय

सय

या पाखरांचे हे थवे
जाई माझ्या माहेरा
सांगे घरची ग खुशाली
मायेचा मिळे सहारा

कौलारू घर असे तिथे
माड पोफळी ग अंगणी
वाहे पाट परसदारी
कोकिळा गाते ग गाणी

डवरलेले फुलं नि वेली
मंजीरी हसे ग गाली
राधा कृष्ण वृंदावनी
तेवे दिवा सांजवेळी

डोळ्याच्या पापणकाठी
आठवांची मांदियाळी
मन जाताच वार्यासवे
मोती ओघळे अवेळी

संगीता देशपांडे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.