मोत्याची माळ
तोडली त्यांनी तटकन शुभ्र मोत्याची माळ
निखळलेले मोती,मी गोळा करत राहिले
निष्ठूरपाणे जेव्हा तुडवीत ते निघून गेले
पसरलेले मोती शोधून पुन्हा ओवू लागले
उसावलेल्या मैत्रीची दरी वाढवत ते गेले
जोड किती प्रेमाने मी दोऱ्याला दिली
न लहान मोठे कुणी मैत्रीत जेव्हा उमजले
काळ बदलला गाठवलेली माळ छोटी झाली
नव्याने करावी सुरवात त्यांना वाटे
विखुरलेले कुठेे परत गुंफले जाते?विनया वाळिंबे, कामोठे







Be First to Comment