आर्त आर्जव
बा पांडुरंगा! अजून शांत का उभा कडेवर हात धरोनी
भक्तजन आणि वारकऱ्यांचा टाहो येत नाही का ध्यानी
उन्हा तान्हाची पावसापाण्याची थंडीची त्रासाची पर्वा नाही केली
मग का वेळ लावतोस कमरेवरचे हात सोडून धावत ये खाली
हे कृष्णा! करूनकरा तू दुष्टाचा कर्दनकाळ आहेस ना
तू बघतोस ना या वायरसने आमची काय केली दैना
तूच आमची शेवटची आस मग धावत ये गोपाळा झडकरी
पिसाळलेल्या व्हायरसला मारून टाकण्या सुदर्शनचा वापर करी
हे शिवशंभो! ध्यान लावून का बसला आहेस कैलास पर्वतावरी
या व्हायरस च्या हल्ल्याने सारी जनता झालीय रे कावरीबावरी
उघड तिसरा डोळा आणि कायमची पीडा जाळून टाकरे ती सारी खरी
हे दुर्गा माता! वाघावर बसून, बये तू शांत. का बसलीस मंदिरी
आमचे आक्रोश, प्रार्थना, अर्जंव अजूनही पोहचत नाही का अंतरी
अगाध महिमा देवी तुझा याची प्रचिती देग आई सत्वरी
एवढे अस्मानी संकट आमच्या पिढीने कधी नाही रे पाहिले
बघता बघता आप्तजण मित्र आकस्मित सोडून रे चालले
शेवटचे दर्शन, विधिवत क्रियाकर्म सुधा नाही करता आले
आम्ही सारेच अगतिक हतबल काहीच. की सुचेनासे झाले
टाहो फोडून दिनरात धावा करतोय रे तुझी लेकरे
का अंत पाहतोस देवा या भयंकर संकटातून सोडवरे
व्रतवैकल्य उपासतापास आरती जपनाम चालू आहेत जरी जोरात
जीव आलाय रे मेटाकुटिला सारी मानवजात आहे रे धोक्यात
विलास चव्हाण, सातारा







Be First to Comment