Press "Enter" to skip to content

तौक्ते

तौक्ते

तौक्ते वादळाने केली दैना
कोकणची गेली सारी रैना
नेस्तनाबूत झाली कोकिळ मैना
प्रलयकारी द्रुश्याने दाटून आले नैना…

छप्परे उडाली घरांची
बिजागरे तुटली दारांची
जागा सुटली नाही पारांची
अशी दहशत दाटली वार्‍यांची

आंबा काजूचा पडला खच
ओघळून पडले करवंदांचे घस
पाहून हा फळाफुलांचा सारा नाश
गळ्याखाली उतरेना अन्नाचा घास

सोबत पावसाचा मारा
झाला चिखलाचा गारा
अंगातल्या आटल्या धारा
पाहून तौक्तेच्या रुद्रावताराचा पसारा

ही अवकृपा निसर्गाची
मानवाच्या विकासमय पापाची
आतातरी व्हावे शहाणे
निसर्गाला गृहीत न धरणे…

:- संदिप तांबे, माहिम, मुंबई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.