हिमनग
हिमनगावर स्वार झाले
विहंगम दृष्यात भान हरपले
साथ मिळाली नावाड्याची
ओढ ती चमचमणाऱ्या किनाऱ्याची ।।
सुंदर रंगीत स्वप्नातला
वाळूमध्ये बंगला बांधला
एक मोठी लाट आली
स्वप्ने माझी घेऊन गेली ।।२।।
अनेकदा मी एकटीच असते
मनातून मी रडत असते
कुशीत कुणाच्या शिरु मी
मोकळ्या भावना करु मी ।।३।।
सांगू कुणा मी माझी व्यथा
इथे प्रत्येकाच्या वेगळ्या कथा
इतरांना वाटेल त्रास वृथा
कुठे टेकवू माझा माथा ।।४।।
जगाकडे पाहून हसते मी
त्यांच्या आनंदात सामील मी
असूनी तेथे नसते मी
कोषात माझ्या बसते मी।।५।।
वाटते कधी कुणाशी बोलावे
की मनीचे कागदी लिहावे
नयनी अश्रु गाली ओघळती
अक्षरांवरती थेंब टपकती ।६।
त्या थेंबांचे तळे झाले
मनातले थेंब तळाशी गेले
मनःपटलावर सागर बनला
हिमनग मात्र चमकू लागला।।७।।
सुषमा गोखले ,नवीन पनवेल







Be First to Comment