पाऊस!…तुझा..माझा
तो पाऊस तुझा माझा
रिमझिम झरणारा
ओल्याचिंब गात्रातून
मुक्यानेच बोलणारा
त्या ओल्याशा वस्त्रातून
तनुतच भिनणारा
तुझ्या माझ्या श्वासातून
विरहा संपवणारा
वादळलेल्या ह्रदया
शांत शांत करणारा
प्रेमातील मुकेपण
अल्लद घालवणारा
सख्या हा वेडा पाऊस
बाहेर बरसणारा
अंतरा साद घालून
नव्याने भेटवणारा
हा पाऊस तुझा माझा
स्वतः चिंब भिजणारा
तुझे आणि माझे गीत
हर्षे गुणगुणणारा
अदिती गोखले, नवीन पनवेल






Be First to Comment