सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे वडील जिपमधील पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेले बाळकृष्ण नकुल पाटील यांचे काल रविवार दि.२५ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८.०० वा. उरणच्या राहत्या घरी वृध्दपकाळाने वयाच्या ८२ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी प्रशांत पाटील यांचे बंधू प्रवीण पाटील यांच्या पत्नीचे शनिवार दि. १७ एप्रिल रोजी निधन झाले होते. यामुळे पाटील कुटूंबियावर दुहेरी संकट आले आहे. तरी यातून सावरण्याची शक्ती त्यांना देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. ४ मे रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर येथे सकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. तर उत्तरकार्य गुरुवार दि. ६ मे रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरी आशिर्वाद निवास, सिद्धिविनायक सो. नगरपालिकेच्या मागे, म्हातवली येथे करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे कुटूंबियांनी सांगितले.
पाटील कुटूंबियांवर प्रेम करणारे कुटुंबिय, मित्र, सहकारी पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सर्वाना भेटून सांत्वन करण्याची इच्छा असेल तरी कृपया कोणी भेटण्यास येऊ नये. आपण माझ्या दु:खात सहभागी आहात याची पुर्णपणे मला जाणीव आहे. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर आपण एकमेकाच्या सुख दु:खा साठी आहोतच. कृपया प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबियाची काळजी घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील यांनी केले आहे.











Be First to Comment