Press "Enter" to skip to content

केव्हा तरी एकदा

केव्हा तरी एकदा

परतून तू पहा ना केव्हा तरी एकदा
गाली हसून जा ना केव्हा तरी एकदा

कुंद कलिकेत का , कुजबूज ही चालली
फुलवून त्यास जा ना , केव्हा तरी एकदा

मेघांमध्ये नभी का ,आक्रोश आहे माजला
बरसून तू पहाना ,केव्हा तरी एकदा

कित्येक रंजनारी स्वप्ने उशाशी येतील
हरवून तू पहा ना , केव्हा तरी एकदा

यमुनातीरी गोपगायी , खिन्न का रे जाहल्या
रास तुझा पुन्हा खेळ , केव्हा तरी एकदा

सुमिता एस .सबनीस
ता.सेलू जि.परभणी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.