सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
मुबंई, नवी मुंबई व पनवेल बरोबर उरण ही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे. दररोजच्या येणारया रिपोर्ट मधील वाढत असलेली आकडेवारी पहाताच भीतीचे काहूर माजत आहे. तरी उरणच्या जनतेने घाबरू न जाता या आजाराचा हिंमतीने व सावधगिरीने सामना करणे आवश्यक बनले आहे. जी काही नियमांची बंधने आहेत ती व्यवस्थित पाळली तर नक्कीच कोरोनावर मात करू शकता असा विश्वास डॉक्टरांच्या टीमने व्यक्त केला आहे.
आजच्या कोरोना रिपोर्टमध्ये उरणमध्ये ७६ जण पॉजेटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या आलेल्या लाटेने देशात व राज्यात हाहाःकार माजवला आहे. गेल्या वर्षी कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर सर्व व्यवहार बंद पडले होते. पाच ते सहा महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन पुन्हा सुरू होऊ लागले होते. परंतु पुन्हा मार्च महिन्यापासून कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेने भयानक स्वरूप धारण केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात व राज्यात हाहाःकार माजविण्यास सुरुवात केली आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव देशाच्या व राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे. यामध्ये अनेक तरुण तरुणींचा बळी जाताना दिसत आहे. एकीकडे कोरोना बाधितांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी बेड खाली मिळत नाही तर दुसरीकडे कोरोनाने बळी जाणाऱ्यांना जळीत करण्यासाठी जागा मिळत नाही अशा महाभयानक परिस्थितीचा सामना करण्याची वेळ सर्वांवर येऊन ठेपली आहे.
आज तुमच्याकडे सर्व काही असले तरी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यातून सहीसलामत बाहेर येण्यासाठी त्याऐवजी तुमची प्रतिकार शक्ती महत्वाची ठरत आहे. तसेच आपल्या उपचार करणारे डॉक्टरही आपल्यापैकी कोणी तरी असणार आहेत. त्यामुळे तेही माणसंच असणार आहेत. याचा सारासार विचार करूनच व कोरोनावर मात करण्यासाठी काम नसेल तर घराबाहेर पडू नये तसेच घराबाहेर पडल्यानंतर शासनाने जी काही नियमावली दिली आहे. त्याचे तंतोतंत पालन केले तर नक्कीच कोरोनावर मात करणे शक्य होणार आहे.
आज कोरोनाचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यामध्ये ७४ जण पॉजेटीव्ह असून उपचार करून घरी सोडलेले व मयत कोणीही नाहीत. उरणमधील पॉजेटीव्हची आकडेवारी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेत खळबळ माजली आहे. तरीही काहीजण कोरोना नसल्याचा दावा करीत आहेत. परंतु याची झळ ज्यांना पोहचली आहे. त्यांनाच कोरोना काय आहे हे माहिती पडले आहे.
आजच्या घडीला मुबंई, नवी मुंबई, पनवेल सारखी परिस्थितीत उरणमध्ये होऊन कोरोनाच्या विळख्यात उरणची जनता अडकू लागली आहे. दररोजची वाढत चाललेली आकडेवारी पाहता भीतीचा गोळा येत आहे. तरी उरणच्या जनतेने स्वतः ची सुरक्षितता स्वतःच करण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा भयानक परिस्थितीचा सामना तुम्हांआम्हांला करावा लागेल. यासाठी आपल्या व आपलं कुटूंब, मित्रपरिवार व हितचिंतक यांच्यासाठी तरी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.
Be First to Comment