Press "Enter" to skip to content

चाहूल

चाहूल

वळले पाय पुन्हा
आज नदीकाठी
होत्या तशाच सा-या
तिथे खूणगाठी

निर्जिव त्या खुणा
पुन्हा बोलु लागल्या
मनातल्या भावना
पुन्हा सजीव झाल्या

होती तशीच तेथे साक्ष
त्या पिंपळ झाडाची
पर्णांच्या सळसळीने
आठवे हितगुज शब्दांची

आर्त हाक माझी
गेली हवेतच विरुनी
जीव कासावीस,
तुजविना ये ना फिरुनी

एवढ्यात चाहूल लागली
विहरणा-या ढगांची
हा तुझा निरोप की
खूण ही आगमनाची

थंडगार वा-याची झुळूक
स्पर्शून मज गेली
निमिशात भासले,
“सखी”तूच भेटाया आली

दिलीप आचार्य
कवाई, राजस्थान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.