विठ्ठल कृपा
भक्त वैष्णवांचा मेळा
असे चंद्रभागेच्या तिरी
मेघगर्जनेसह वाजत गाजत
आल्या पाऊस सरी
दिला संदेश पांडुरंगाने
जातो आता विश्रांतीसाठी
धाडीले अमृता तुम्हासी
नवसंजीवनी देण्यासाठी
फुलवा आपुले जीवन
कष्टाचे बिज रुजवुणी
सजवा सृष्टी हरित तृणांनी
मायेची पखरण करण्यासाठी
चातुर्मासे, विश्रांती समये
विरह गीत न गावे
आठवण माझी येता
जल बिंदूत मज न्ह्याहळावे
धनंजय देशमुख, नवीन पनवेल







Be First to Comment