रंगपंचमी
पंचमीचा सण
स्वतःतच न्हाला
ओल्या शिवारात
सजुनिया आला
शिवार भिनले
अल्लद तनात
नव्याची चाहूल
उगा ती मनात
मनाच्या रंगात
सृष्टीचीच छाया
सावळ्या बाधेत
आगळीच माया
निःशब्द ही बाधा रंगांचाच श्वास
रंगीत दुतात मोह
क्षण खास
पुलकित क्षण
अंतरीचा कण
मनसतारीला
रंगाचे कारण
अदिती गोखले, नवीन पनवेल







Be First to Comment