वि दी र्ण
चल रे गड्या आता थांबू नको
दमलास तू तरी थकू नको
अवघड असली जरी ही वाट
गड्या फिरवू नको तुझी पाट
आता पूर्वीसारखी दुनिया नाही राहिली
सारी दुनियाच आत्मकेंद्रीत झाली
एकदा का सोडली साथ नशिबाने
मन मारून जगावे लागते रे मुकाट्याने
माझं माझं म्हणून आता काही नाही उरलं
कशातच मन लागत नाही ते उरलं सुरलं
आता ऐकेक दिवस नुसता ढकलायचा
पूर्वीच्याच आठवणीत आनंद मानायचा
सांगा! सदा सर्वदा मनासारखे कसे रे घडेल
कोणा कळले आहे का, की नियती केव्हा नडेल?
आपले ओझे आपल्याला वहायचे असते
सकारात्मक विचाराने फक्त ते हलके करायचे असते
आपल्या कर्माचेच फलीत हे ओझं असते
तरुणपणी हे ओझं अजिबात जाणवत नसते
म्हातारपणी हे ओझं आता मानेला पेलवेना
कणाच मोडलाय तर मान कशी साथ देईल सांगा ना?
खरं सांगतो! आम्हाला नको तुमचे सोने नाणे
आता फक्त हवे दोन गोड शब्दाचे बोलणे
शेजारी बसून हातातहात घेऊन मायेने विचारपूस करणे
तरच उतरत्या वळणावर होईल हे सुखकर जीणे
विलास चव्हाण
सातारा रोड ( पाडळी )







Be First to Comment