धुलिवंदन
धूलिवंदन करु
करु या धूलिवंदन करु.
अहंकार, मत्सर, रागाला
मनामनातून दूर करु.
दुष्कृत्ये नि कुकर्मांना
मानस होळीत दहन करु.
वर्षभरातील कटू स्मृतींना
विसरायाचा यत्न करु.
नव्या ऋतुचे नवे सोहळे
चैतन्याच्या रंगी भरु.
सुहास्य वदने, स्वच्छ मनाने
मनातील अंतर पार करु.
नको निराशा अवतीभवती
सप्तरंगी नव आशेला मनामनावर स्वार करु.
ज्या भूमीवर पाय ठेवले
विश्वासाने पाय रोवले
कृतज्ञतेने मनापासूनी
धूळ तिची मस्तकी धरु
मातृभूमीला नमन करु
धूलिवंदन करु
करु या धूलिवंदन करु.
सौ. अपर्णा साठे, नवीन पनवेल







Be First to Comment