Press "Enter" to skip to content

कविश्री अरुण म्हात्रे यांची जागतिक रंगमंच दिनानिमित्त कविता

नटसम्राट- डॉ. श्रीराम लागू

वि. वा. शिरवाडकर लिखित

गाजलेले नाटक नटसम्राट

अभिनय संपन्न श्रीराम लागूंनी

भूमिका केली त्यात अफाट...

आप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत

अप्रतिम अभिनय लागूंचा पहावा

कधी रागाने जणू तवा तापलेला

क्षणात शांत गारवा अनुभवावा...

जिवंत लिखाण शिरवाडकरांचे

उदाहरण अनेक घर - कुटुंबांचे

प्रसंग- अभिनय- शब्दफेक छान

डॉक्टर लागू नटसम्राट हाडाचे...

बालपण- तरुणपण- म्हातारपण

तीन अंकांतून जायचंय प्रत्येकाला

पार पाडायचीय गुणसंपन्न भूमिका

मला- तुला- याला- अनं त्याला...

मला- तुला- याला- अनं त्याला !!

©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.