Press "Enter" to skip to content

नाटक नाटकच असतं

नाटक नाटकच असतं

प्रत्येक नवा प्रय़ोग हा प्रयोगच असतो;
तो प्रयोग पार पडेपर्यंतची
हुरहुर, काळजी, मग झालेला आनंद हे सगळं म्हणजे नाटक असतं.

प्रत्येक प्रयोगाच्या
पहिल्या एंट्रीआधी
छातीत होणारी धडधड
म्हणजे नाटक असतं.

स्पॉटलाईटच्या प्रकाशात अंगावर येणारं प्रेक्षागृहं;
त्या प्रकाशात म्हटलेली स्वगतं
त्यावर आलेल्या
एका सुरातल्या टाळ्या
म्हणजे नाटक असतं.

एखाद्या जमून आलेल्या प्रवेशानंतर
सहकलावंताची लगेचच
मिळालेली दाद;
त्याने विंगेत येवुन
मारलेली मिठी,
म्हणजे नाटक असतं.

मध्यंतरात घाईघाईत
घेतलेला वाफाळता
चहा म्हणजे नाटक असतं.

आणि प्रयोग संपल्यावर
चेह-यावरचा मेकअप
उतरवताना पुन्हा लागलेली
नव्या प्रयोगाची उत्सुकता
म्हणजे नाटक असतं.

आणि हे सगळं सतत अनुभवणं
म्हणजे फक्त आणि फक्त नाटक असतं.

म्हणून नाटक नाटकच असतं.

देवा महाराजा;

नाटक घडत राहो.

केदार जोशी, पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.