उठ राणी पहाट झाली
आता कुठे जाग आलीय. स्व भान हरपून स्वत्व विसरून त्यागाच्या काट्यांनी वेढते
जखमांचे वार प्रहार सहते.
आता आता कुठे जाग आलीये
ऊठ गाडी राणी पहाट झाली
समानतेचं तांबड फुटलं. कर्तृत्वाचं कोंबडं आरवल. मनगटावर सार पेललं
खांद्याला खांदा लावून सारं झेललं.
आत्ता आत्ता कुठं जाग आलीए उठ राणी राणी पहाट झाली
स्त्रीत्व अस्तित्व कधीच केलं बहाल चौकट पार कर सोड उंबरठा महाल गर्भारपणात डोहाळ ओटी भरणात जड पावल.
वेदांनी बाळंतवेणानी मातृत्वाचं काळीज रक्ताळलं ,
सारं सारं कर सहनआहे तूच शक्ती माणूस म्हणून गणले जाते
किती ताठ मानेनं पुरुषप्रधान संस्कृतीच्या बेड्या तोड.
जागी हो राणी
भविष्याशी नाते जोड. लक्ष्मणरेषा पुसून टाक हे तुझ्या हाती .
कालच्या वेदनांना दे तूच मुठमाती.
मोहाच्या पिंजर्यातून सुटका घे घे करून
विद्वत्ता कौशल्य हुशारीने आभाळ घे जिंकून .
स्पंदनात तुझ्या लेकी बाईपणाची समृद्धी.
कोरे रक्तबंबाळ आला
वाटेत पारधी नको होऊ शिकार , काढ तुझी तलवार त्यास
कर तू हद्दपार
आरे ला कारे म्हणत जग ना लढाया लढत.
उठ राणी जागी हो
बघणार यांचे डोळे, थांबा अमानुष पाशवी अन्यायाचे चाळे.
सगळ्याच्या मुळाशी तुच का जळायचं?
स्त्री ही माणूसच आहे
सांगा ना कधी कळायचं ?
थांबव आता मशालीची होरपळ
स्वकर्तृत्वाने प्रकाशवाटा उजळ.
आण जीवनी मखमली उदयाची हिरवळ .
मनाच्या पंखात आहेत तुझ्या आत्मविश्वासाचं बळ.
आता कुठं जाग आलीये
उठ राणी पहाट झाली .
पूर्णिमा शिंदे, मुंबई







Be First to Comment