संतबोध
ज्ञानाचीया ओवीत
विठू मज भेटला
तुकाचिया अभंगी
जीवन सार ऐकाटला
सावता म्हणे ऐक
मुखी असावे नाम
जनीच्या घरी मग
विठू करी सारे काम
मुक्ता म्हणे नको
मिरवू फुका दंभ
वेणाच्या किर्तनी
राम असे तो दंग
नामाच्या मुखी
विठूचाच वास
ऐका म्हणे ध्यास
अंतरंगी सहवास
समर्थ वदले
एक धरा कास
जीवन अभ्यास
मनोबोधे होतसे
संगीता देशपांडे, नवीन पनवेल







Be First to Comment