Press "Enter" to skip to content

दर्शन “अद्वेताचे”

दर्शन “अद्वेताचे”

कधी रुसणे कधी हसणे
आयुष्यातील नवी वळणे

मौनातून ही होई संवाद
नसे वाद नसे प्रतिवाद

प्रश्नाआधी येईल उत्तर
दोघांमधील संपे अंतर

नजरेने कळतील इशारे
प्रेमालाही नवीन धुमारे

मनातल्या कुंठेची क्षती
दोघांची तीथेच प्रगती

परस्परांचा असे अभिमान
आत्मा होईल एक समान

सर्वस्वाचे होई समर्पण
अद्वैताचे मग होई दर्शन

  • शेखर अंबेकर, आदई

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.