मन
माया ममतेच्या सावलीत
मन गुंततं गुंतत,
इंद्रधनु परी नभात,
मन फुलतं फुलतं.
कौतुकाच्या थापेने
मन सुखावत जातं
….पुढे जाण्याची प्रेरणा
..मन देतं रहातं.
मन क्रोधाने खर तर,
गढूळ पाण्यागत होतं,
परी शांत झाल्यावर
मन निवळतं निवळतं
…… काना कोपर्यात फिरूनी
.मन विचार करतं
….. खर्या खोट्याच गं ज्ञान
त्याला आपसुक होतं
आनंदाच्या लहरीवर
मन डोलतं डोलतं,
सुखाच्या हिंदोळ्यावर मन झुलतं झुलतं.
……प्रेमाच्या ओलाव्याने
…..मन न्हाऊन निघतं
..एकटेपणाच्या जाणिवेत
………मन व्याकुळ गं होतं
मन चंचल ग बाई,
कधी स्थिर न राही.
परी संगत ग आपली
कधी सोडतच नाही.
…..वर साज चढवूनी
मन ठेवावं कुपीत ,
संस्काराच्या कोंदणात
रूप त्याचं ग वाढवाव.
नयना पेंढारकर, नवीन पनवेल







Be First to Comment